Website of Vasai, Virar

  • Full Screen
  • Wide Screen
  • Narrow Screen
  • Increase font size
  • Default font size
  • Decrease font size
 

Send Gifts, Flowers to Vasai Virar

अनेक ठिकाणी उद्या माघी गणेशोत्सवाचे कार्यक्रम

E-mail Print PDF

नालासोपाऱ्यातील सर्वप्रथम माघी गणेशोत्सव मंडळ असलेले श्री चक्रेश्वर भजनी मंडळ, उमराळे यांचा माघी गणेशोत्सव गुरूवार, शुक्रवार २६ व २७ जानेवारी रोजी होणार असून श्री चक्रेश्वर मंदिराजवळ, उमराळे येथे गणेशभक्तांनी दर्शन व प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

साईसिद्धी मित्र मंडळाने वाघोली, मोर आळी येथे धामिर्क विधींसह गुरूवारी रात्री विनोदी नाटकाचा प्रयोग आयोजित केला आहे. विरार पश्चिमेला असलेले मंगलमूतीर् मंदिर तसेच आगाशी चाळपेठ-पुरापाडा येथील गणेश मंदिरातही होणार आहेत. भुईगांव येथील श्री गणेश मित्रमंडळानेही भुईगाव, म्हात्रे आळी येथे गुरूवारी सकाळी प्रतिष्ठापना, महाप्रसाद, महाआरती, रात्री ९ वाजता स्वरगंध समधुर गाण्यांचा 'नादब्रम्ह' हा कार्यक्रम होणार आहे.

भाईंदर पूवेर्ला युथ युनायटेड वेल्फेअर सोसायटीने माघी गणेशोत्सवानिमित्त केबीन रोड, दीपक नगर येथे गुरूवारी पूजन व शुक्रवारी विसर्जन होईल. तर भाईंदर पश्चिमेला जमुनाबाई ठाकूर मार्गावरील सिद्धिविनायक मित्रमंडळातफेर्ही गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

पालघर तालुक्यात माहीम वागुळसार येथे गणेशजयंती साजरी करण्यात येणार आहे.

मतदानावर बहिष्काराचा इशारा

E-mail Print PDF

रानगाव ( वसई पश्चिम ) येथे तीन वर्षांत कुठलीही विकासकामे झाली नाहीत वा नागरिकांना कोणत्याही सार्वजनिक प्रकारच्या सार्वजनिक सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत . याच्या निषेधार्थ मतदारांनी पंचायत व जिल्हा परिषद निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय मनसे पक्षातर्फे घेण्यात आला आहे .

कलाकारांचा आज जल्लोष
पालघरमध्ये पहिल्यांदाच अवधूत गुप्ते लाईव्ह कॉन्सर्ट रंगणार आहे . शिवानंद ग्रुप पालघरतर्फे ' जल्लोष महाराष्ट्राचा ' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय . त्यामध्ये अवधूत गुप्तेसोबत क्रांती रेडकर , अभिजित खांडकेकर , जान्हवी प्रभु - अरोरा , पुष्कर श्रोत्री आदी कलाकार जल्लोष करणार आहेत . गुरुवार , २६ जानेवारी रोजी संध्याकाळी साडेसात वाजता आर्यन शाळेच्या मैदानावर हा रंगारंग सोहळा रंगेल .
बाळासाहेबांच्या वाढदिवसांचे कार्यक्रम

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वसई , भाईंदर , बोईसर पट्ट्यात शिवसैनिकांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते . रविवारी नालासोपाऱ्यात सहा ठिकाणी शिवसैनिकांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ४२७ रक्तदात्यांनी रक्तदान केले . भुईगाव येथील आनंदाश्रमात आबाल - वृद्धांना धान्य , खाऊ , फळ वाटप करण्यात आले . वॉर्ड क्रमांक ४५ मध्ये महिलांसाठी तीळगुळ समारंभ पार पडला . विरार शहरात वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर , ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र , ९४ रूपयात पॅनकार्ड , गरजूंना ब्लँकेट वाटप असे कार्यक्रम केले .

पाककला स्पर्धा
वसईतील समाजउन्नती मंडळ , माणिकपूर या संस्थेने ६८ व्या वर्षात पदार्पण केले असून मंडळ विविध सामाजिक , सांस्कृतिक उपक्रम राबवले जात आहेत . मंडळाच्या महिला विभागातर्फे २६ जानेवारी रोजी हळदीकंुकू व पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे .

नारायण मानकर यांची निवड
वसईतील ' वसई विकासिनी ' या संस्थेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत नारायण मानकर यांची अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली . गेली ६ वर्ष मानकर हे या संस्थेच्या अध्यक्षपदी काम करीत असून ही संस्था अनेक उपक्रम , कार्यक्रम राबवत असते .

विज्ञान प्रदर्शनात सावे महाविद्यालय प्रथम
जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनात पालघर तालुक्यातील तारापूर एज्युकेशन सोसायटीच्या हरेश्वर दामोदर ( भाउसाहेब ) सावे कनिष्ट महाविद्यालयाला जिल्हा स्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला . भाईंदर येथील अभिनव विद्यामंदिर घोडदेव येथे आयोजित करण्यात आले होते . बारामती येथे २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात सावे महाविद्यालायाने तयार केलेली प्रतिकृती मांडण्यात येाणार आहे .

बंद घरांमध्ये चोरी
गेले काही दिवस माणिकपूर , वसई , नालासोपारा , विरार भागात घरफोडीचे अनेक गुन्हे घडले आहेत . नोकरीनिमित्त सकाळीच घरातील दाम्पत्य बाहेर पडल्यानंतर अशा बंद घरांवर वॉच ठेऊन घरफोडी होत असल्याचे निदर्शनास आले आहे . यामुळे घरे लॉक करताना काळजी घ्यावा , असे आवाहन करण्यात आले आहे . नालासोपारा पश्चिम , चौथा रस्ता , श्रीप्रस्थ भागातील फुलवा कॉम्प्लेक्सचे रहिवासी मधुकर तांबे यांच्या घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम नुकतीच चोरून नेण्यात आली .

वर्तक कॉलेजमध्ये 'उडाण महोत्सव'

E-mail Print PDF

वसईच्या अण्णासाहेब वर्तक कॉलेजमध्ये मंुबई विद्यापीठाच्या 'आजीवन शिक्षण आणि विस्तार सेवा' विभागाच्या वतीने २० व २१ जानेवारी रोजी दोन दिवसीय 'उडाण महोत्सवाचे' आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात मुंबई विद्यापीठाची जवळ-जवळ ३५ कॉलेज सहभागी होणार आहेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून या महोत्सवाचे आयोजन केले जाते.

वसईच्या वर्तक कॉलेजमध्ये अशा प्रकारच्या विविध कार्यक्रमांचे दरवषीर् आयोजन होत असते. त्याला विद्यार्थ्यांचाही चांगला प्रतिसाद मिळतो. या उडाण महोत्सवात सहभागी कॉलेजातील विद्यार्थ्यांसाठी पथनाट्य, पोस्टर मेकिंगस्पर्धा घेण्यात येतात. या महोत्सवात सुमारे ६०० विद्याथीर् व त्यांचे शिक्षक सहभागी होणार आहेत. हा महोत्सव वसई येथील अण्णासाहेब वर्तक कॉलेजच्या मामासाहेब मोहोळ हॉल, नवीन इमारत येथे होणार आहे. महोत्सवाच्या उद्घाटनासाठी मंुबई विद्यापीठाच्या 'आजीवन शिक्षण आणि विस्तार सेवा' विभागाचे संचालक डॉ. दिलीप पाटील हे उपस्थित राहणार असल्याचे प्राचार्य डॉ. सुशील केळकर यांनी सांगितले. या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतात. त्यामध्ये नाट्यप्रवेश व नृत्य पाहण्यासारखे असतात असे ते म्हणाले. या महोत्सवाचा

विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा व आपल्या कला-गुणांचा प्रत्यय द्यावा, असे आवाहन डॉ. केळकर व विस्तार सेवा शिक्षक डॉ. शत्रुघ्न फड यांनी केले आहे.

माझा मुलगा सुरक्षित हवाय...

E-mail Print PDF

' रसलने ६ जानेवारीला सायंकाळी मला फोन करून ख्रिसमस व नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. मी खूप थकलोय, जास्त कामामुळे ख्रिसमसच्या दिवशी फोन करायला मिळाला नाही असे सांगून त्याने सगळ्यांची चौकशी केली. एखादाच मिनिट तो बोलला असेल, ते त्याच्याशी झालेले अखेरचे बालणे. मला माझा रसल माझ्या घरी सुरक्षित हवा आहे. काहीही करा...हे सांगताना रसलच्या आईला अश्रू अनावर झाले. इटलीत दुघर्टनाग्रस्त झालेल्या कोस्टा कॉन्कॉडिर्या जहाजवरील रसल टेरेन्स रिबेलो हा अद्यापही बेपत्ता आहे.

नायगावच्या डायस अॅण्ड परेरा नगरमधील ओसिस पार्कमध्ये तळमजल्यावर फ्रँक रिबेलो यांचे कुटंुब राहते. ७० वषीर्य वडील फ्रँक तीन वर्षांपासून पॅरिलिसीसमुळे घरीच आहेत. तर आई ग्लॅडीस या नोकरीतून निवृत्त झाल्या आहेत. त्यांची दोन्ही मुले गेली काही वर्ष इटलीमध्ये नोकरीसाठी आहेत. मोठा मुलगा केवीन (३५) दहा वर्षांपासून इटलीतील मिलान सिटीमध्ये काम करतो. तर गेल्या पाच वर्षांपासून रसल रिबेलो (३३) हा जहाजावर स्टुअर्ड म्हणून काम करत होता. अत्यंत हुशार, सगळ्यांशी प्रेमाने वागणारा रसल कुटंुबात तसेच मित्र परिवारातही प्रिय आहे. रसल विवाहित असून त्याला साडेतीन वर्षांचा मुलगा आहे.

केविनला सहकार्य नाही

या घटनेनंतर रसेलचा भाऊ केवीन घटनास्थळी गेला. त्याने जवळपासच्या हॉस्पिटल, हॉटेलमध्ये रसलचा शोध घेतला. रसलच्या शोधात भारतीय दूतावासाकडून हवे तसे सहकार्य मिळत नसल्याचे केवीनने फोनवरून सांगितले.

विनीत सुखरूप

नवघर येथील विनीत बानसिंग हा सात महिन्यांपूवीर् स्टुअर्ड म्हणून या जहाजावर कामाला गेला होता. लाईफ जॅकेटच्या सहाय्याने तो वाचला.

मृतांची संख्या ११ वर

गिग्लिओ, इटाली : दुर्घटनाग्रस्त कोस्टा कॉन्कॉडिर्या जहाजावरील मृतांची संख्या ११ झाली आहे. इटलीच्या नौदलाने घेतलेल्या शोधमोहिमेत मंगळवारी आणखी पाच मृतदेह मिळाले. अद्याप २४ जण बेपत्ता आहेत.

कॅप्टनची चौकशी सुरू

दुर्घटनाग्रस्त जहाजाचा ब्लॅकबॉक्स ताब्यात घेण्यात आला असून कॅप्टनला वारंवार डेकवर बोलावण्यात येऊनही तो उपस्थित झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याअथीर् त्याने प्रवाशांच्या आधीच पलायन केल्याचे उघड झाले आहे. कोस्टा कॉन्कॉडिर्याचा कॅप्टन श्चेट्टनला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे.

काँग्रेसच्या कार्यकारिणीत वसईचे कार्यकर्ते

E-mail Print PDF

ठाणे ग्रामीण जिल्हा काँग्रेसची निर्वाचित कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली असून त्यात वसईतील अनेक कार्यर्कत्यांना स्थान देण्यात आले आहे.

वसईतून डॉ. विजया समेळ, विरारचे विकास वर्तक, सुभाष कुलेर्कर यांना उपाध्यक्षपदी, वसईतील दत्ता नर यांना कोषाध्यक्षपद, सरचिटणीस म्हणून नालासोपाऱ्याचे अशोक पेंढारी, नितीन म्हात्रे, धनंजय गावडे यांची निवड करण्यात आली आहे. चिटणीस, कार्यकारिणी पदावरही वसईतील कार्यर्कत्यांना संधी दिली गेलीय.

या कार्यकारिणीमध्ये स्थान न मिळालेले काँग्रेसचे काही ज्येष्ठ कार्यकतेर् नाराज असून ते राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे समजते. काहींनी राष्ट्रवादीचे ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आनंद ठाकूर यांना संपर्क साधून राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे येत्या काही दिवसात काँग्रेसमधील नाराज गट राष्ट्रवादीत सामील होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

ग्रामीण जिल्ह्यात काही तालुक्यांमध्ये आघाडीबद्दल काँग्रेस-राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहेत. राष्ट्रवादीचे नेते व पालकमंत्री गणेश नाईक यांनी सेना-भाजप, मनसे सोडून काँग्रेस, कुणबी सेना किंवा कुणाशीही बोलणी करा अशी मुभा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डहाणू, जव्हार, विक्रमगड, मोखाडा भागात आघाडी करण्याबद्दल चर्चा करीत आहेत.

Page 1 of 60

  • «
  •  Start 
  •  Prev 
  •  1 
  •  2 
  •  3 
  •  4 
  •  5 
  •  6 
  •  7 
  •  8 
  •  9 
  •  10 
  •  Next 
  •  End 
  • »
 

Poll

Are you comfirtable with phone/email invitations?





Results

Login Form

You are here: Home